सोयाबीन बियाणे कांही जाती/soyabin seeds variety/ सोयाबीण पेरणीसाठी उत्तम बियाणे वाण/ जात कोणती?🤔
शेतकरी मित्रानों,
सोयाबीन बियाणे पेरणीसाठी खरेदी करण्याअगोदरच आपण या बाबींचा विचार करणे आवश्यक आहेत त्या खालीलप्रमाणे :-
सोयाबीण बीयाणे खरेदी करण्याअगोदर आपणास सोयाबीण बियाण्याच्या विविध वाणांचा /जातीचा अभ्यास असणे आवश्यक आहे.
अभ्यास म्हणजे त्यांचे गुणधर्म, सोयाबीनच्या विविध वाणांचा/जातींच्या गुणधर्माचा परीक्षण करत असताना आपण खालील मुद्द्यांचा किंवा बाबींचा विचार करणे आवश्यक आहे.
१. कालावधी.
२. हवामाण.
३. रोगप्रतीकारक्षमता.
४. पाण्याची आवश्यकता.
५. जमीणाचा प्रकार.
६. आपण किती प्रमाणात करु शकतो ते नियोजण आणी मेहणत.
शेतकरी मित्रांनो या लेखात आपणास जी माहिती मिळणार आहे असी माहीती आपणास दुसरीकडे लेखीस्वरुपात मिळणे कठीणच. कारण मीही स्वत: शेतकरीच आहे . शेती करत असताणा काय अडचणी येतात याचा अनुभव मी जवळून घेतलेला आहे.त्यामुळे तुम्ही हा लेख लक्षपुर्वक वाचा. मला खात्री वाटते की आपणास सोयाबीण शेती करत असताणा आपले उत्पन्न वाढण्यास हा लेख सहाय्यक राहील.
शेतकरी मित्रांनो बऱ्याच जाती किंवा प्रकार आहेत.
या लेखातुण मी स्वत: माझ्या शेतात अनुभव घेतलेल्या जाती संदर्भात माहीती सांगणार आहे.
या लेखातुण मी स्वत: माझ्या शेतात अनुभव घेतलेल्या जाती संदर्भात माहीती सांगणार आहे.
१. एम.ए.यु.एस. १५८ :-
:- शेतकरी मित्रहो या जातीचे सोयाबीण चांगले आहे. मध्यम उंची , तरीही योग्य मेहणत केली तर २.५ ते ३.० उंचीचे हे सोयाबीण शेंगात दाणे भरण्याचे वेळी राहते.
:- बुडापासुण शेंगा लागतात २ ते ३ दाणा असणाऱ्या शेंगा असतात.
:- पाणे जाड व आकर्शक असतात.
:- पिक गोंडस व फुटी असणारे.
:- ९० ते १०० दिवसात काढणे आवश्यक.
पिकाच्या फुटी हया आपण एकरी बियाणे किती पेरतो, आपली जमीण प्रकार व मेहणत यावर आवलंबून राहते.
:- एकरी १० क्विटंल उत्पादन घेतले.
शेतकरी मित्रांनो मी एकरी उत्पादन सांगतोय यासाठी मी फवारणी वेळेवर केली व पाऊस चांगला झाला होता. फवारणी संदर्भात आपले प्रश्न असतील तर कमेंट मध्ये आवश्य विचारा.
२. जे.एस.३३५:-
या जातीमध्येे आणी एम.ए.यु.एस. १५८ विशेष असा बदल नाही , एक बदल वाटला जे.एस.३३५ पेेक्षा एम.ए.यु.एस.१५८ हेे पाणे जाड राहतात .
उत्पादणात व कालावधी मध्ये एम.ए.यु.एस.१५८ व जे.एस.३३५ समान आहेत.
३. एम.ए.यु.एस.१६२ :-
:- उची ३ ते ४ फुट .
:- हार्वेस्टरने काढण्यास उत्तम.
:- एकशेवडी सरळ जाणारी जात.
:- रोगप्रतीकारक क्षमता उत्तम .
:- काढताणा शेंगा उन्हामुळे फुटण्याचे प्रमाण कमी.
:- एकरी ११ ते १२ क्विंटल उत्पादन.
:- काढणी कालावधी १०५ ते ११५ दिवस.
पेरणी वेळेवर म्हणजे ३० जुन पर्यंत जास्त योग्य.
४. के.डी.एस.७२६:-
ज्या शेतकऱ्याची उत्तम नियोजन मुबलक पाणी आणी महत्वाचे म्हणजे फवारणी वेळेवर करुण उत्पादन जास्त घ्यायचे आहे त्याच्यासाठी ही जात उत्तम आहे.
:- भरपूर फुटी व उंची असणारी.
:- टपोरे दाणे वरील ३ जातीपेक्षा मोठे दाणे.
:- रोगास संवेदनशील म्हणजे बळी पडणारी.
:- फवारणी वेळेवर न केल्यास किड रोग आटोक्यात आणणे कठीण.
:- मुबलक पाणी आवश्यक, पाण्याचा ताण जमत नाही.
:- एकरी १२ ते १५ क्विंटल उत्पादन.
:- वरील ३ जातीपेक्षा जास्त उत्पादन.
:- ११० ते १२५ काढणी कालावधी.
शेतकरी मित्रांनो वरील चार सोयाबीन जातींचा गुणधर्मांचा अभ्यास केल्यानंतर सर्व बाबींचा सर्व बाजूंणी विचार करुण योग्य निर्णय घेऊन आपली सोयाबीन शेती फायद्याची करुयात.
धन्यवाद.
- विरेंद्र रावसाहेब झांबरे
मो.क्र.९८३४८२७७४१
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा