शेतीचा अभ्यास शेतकऱ्यांचा विकास. study of agriculture and progress of farmer in marathi

 शेतीचा अभ्यास व शेतकऱ्यांचा विकास ..


               मोघम शेती करण्याची सवय  अंगवळणी पडली आहे. म्हणजेच आपल्याला आलेल्या अनुभवाचा किंवा यशस्वी शेतकऱ्याचा अनुभवाचा अभ्यास न करता वर्षानुवर्षे आपण आहे त्या पध्दतीने शेती करतो आणी त्यामुळे आपण शेतकरी आर्थिक म्हणजेच पैस्याच्या आडचणीत जात आहोत. याकरीता आपण गाढवाप्रमाणे फक्त राबण्यापेक्षा कमी अंगमेहणत व कमी खर्च करुण या लेखातुन शेतीचा अभ्यास व त्यातुन शेतकऱ्याचा विकास साधन्याचा प्रयत्न करुयात.

          हे करत असताना मी आपल्यासोबत फक्त पुस्तकी ज्ञान किंवा पोपटपंची करणार नसुन माझे स्वत:चे व मी पाहीलेल्या शेतकऱ्याचे खरे अनुभव व त्या अनुभवातुन ध्यानात आलेल्या व समजलेल्या गोष्टी आपणासमोर व्यक्त करणार आहे , अपेक्षा करतो की हा लेख माझ्या हाडाच्या शेतकरीमित्राला शेती सुधारण्यास मदत करेल. 

         शेतकरी मित्रहो आपण वर्षानुवर्षे जे पिके घेतो त्याच्याबद्दल आपल्याला जर कोणी खालील प्रश्न विचारले तर आपण त्याची उत्तरे देऊ शकतो का? 

  •  या पिकाला कोणत्या प्रकारची जमीण उत्तम?

  • या पिकाला कोणते हवामान उत्तम?

  • या पिकाला पाणी किती आवशयक?

  • या पिकाची कोणती व्हरायटी उत्तम? क्रमवारीत मांडा.

  • एकरी  पेरणीसाठी, लागणीसाठी किती बियाणे लागते व्हरायटी प्रमाणे.

  • या पिकास कोणते रोग जास्त व त्यावरील उपाय    कोणते?

  • या पिकास कोणता खत जास्त उपयुक्त व त्याचे एकरी प्रमाण?

  • या पिकाचा काढण्याचा कालावधी किती.

  • हे पिक सर्वसाधारण,जोखमीचे , अतीजोखमीचे या मधील कोणत्या प्रकारचे आहे.

  • या पिकाच्या उत्पन्नासाठी किती मजुर आवश्यक व त्यांची उपलब्धता वेळेवर होणे शक्य आहे का?

  • फायदेशीर उत्पन्न घेण्यासाठी कोणते मुद्दे महत्वाचे आहेत.

  • शेतकरी मित्रांनो शेती करत असताणा ज्ञान , समज, कार्यक्षमता, जमीण , पाणी, हवामाण, रोग व त्यावरील उपाय, पिकास लागणारे अंदाजीत भांडवल, व्यवस्थापन , बाजारभाव या मुलभूत बाबींचा विचार करणे आवश्यक आहे.

         

          शेतकरी मित्रांनो वरील सर्व मुद्दयांचा आपण विचार केला तर आपली शेती फायदेशीर करणे शक्य होईल.

        

       वरील पैकी एकाही मुद्दाबाबत आपण कमी पडलो तरही आपण अपेक्षीत व फायदेशीर उत्पन्न घेणे शक्य होत नाही.





   

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कांदा रोप तयार करायचय न.१?/how make kanda rop no.1

सोयाबीन शेतीआहे नफ्याची?/Soyabin sheti aahe nfyachi/ सोयाबीन शेती कशी करावी? /soyabin sheti mahiti