सोयाबीन शेतीआहे नफ्याची?/Soyabin sheti aahe nfyachi/ सोयाबीन शेती कशी करावी? /soyabin sheti mahiti
सोयाबीन शेती आहे नफ्याची ?/ सोयाबीन शेती कसी करावी?
नमस्कार शेतकरी मित्रानों,
या लेखातुन आपण शेतकऱ्यासाठी वरदान ठरलेल्या व असलेल्या सोयाबीन पिकाविषयी माहीती घेऊयात.
सदरची म्हणजे या लेखातील माहीती ही केवळ पुस्तकी नसुण माझ्या अनुभवाची सत्य माहीती आहे.
तर चला शेतकरी मित्रहो सुरु करुयात. of
शेतकरी मित्रहो सोयाबीन शेती करत असताना मुख्यत्वे खालील बाबींचा विचार आपणास करणे गरजेचे आहे.
- जमीण/ माती.
- बियाणे वाण.
- पेरणी कालावधी.
- हवामान.
- पेरणी पध्दत/ टोकण पध्दत.
- पाणी व्यवस्थापण.
- फवारणी व्यवस्थापन/ रोग नियंत्रण.
- अन्नद्रव्य व्यवस्थापन/ खत.
- कामगार व्यस्थापण/मजुर.
- काढणी/हाव्रेस्टींग/भरडण.
१. जमीण/माती:- सोयाबीन पिक हे सर्व प्रकारच्या जमीणीत येते. या कारणामुळेच या पिकास शेतकऱ्याचे वरदान आहे. कारण सोयाबीन पिक येण्याअगोदर हलक्या / माळराणावर पैसे देणारे कोणते पिक घ्यावे हा प्रश्न सोयाबीन शेतीमुळे सुटलेला आहे.
२. बियाणे वाण :- सोयाबीन पेरणी करण्याअगोदर वाण / जात/व्हरायटीचे बियाणे घ्यावे ? हा प्रश्न बरीच
वर्ष सोयाबीन शेती करणाऱ्या बहुतांश शेतकऱ्यांना पडतो. हा प्रश्न पडणे ही महत्वाचे आहे कारण फायदेशीर सोयाबीन शेती करण्यासाठी वाण निवड ही महत्वाचा मुद्दा आहे. विचार करुण देखील अभ्यास न करताच किंवा न समजल्यामुळे मोघमच वाणाची निवड करुण खरेदी करतात. अस्या मोघम बियाणे वाण निवडी मुळे अपेक्षीत उत्पादन मिळणे बेभरवस्याचे होते.
मोघम बियाणे घेण्याची कारणे खालील प्रमाणे.
- किफायदेशीर शेतीसाठी बियाणे वाण निवडणे महत्वाचे आहे हे बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत नसते.
- वाण किती व त्यांचे गुणधर्म काय याची माहीती नसते.
- वाण निवडीमुळे उत्पन्नावर परीणाम कसा होतो याची समज नसणे.
- पेरणी कधी होणार याचा विचार होणे आवश्यक.
- जो बियाणे वाण /व्हरायटी निवड करतोय त्याचा पेरणी पासुण काढणी पर्यंतचा लागणारा कालावधी.
- रोगप्रतीकार शक्ती किंवा रोगास बळी पडण्याचे प्रमाण.
- पाण्याची आवश्यकता आणी उपलब्धतता.
- काढताणा शेंगा फुटण्याचे प्रमाण.
हवे असणारे बियाणे मिळेल का नाही या विचाराणे आपण बियाणे पाऊस पडण्याअगोदर खरेदी करूण ठेवतो. परंतू ऊशीरा पाऊस झाल्यास जास्त कालावधीचे सोयाबीन पिकावर शेंगा भरताणा पापडी पडण्याची शक्यता राहते. तसेच रब्बी पिकासाठी उशीर होतो. अस्या वेळी कमी कालावधीचे सोयाबीन घेणे फायदेशीर होते. त्यामुळे आपणास जो वाण जास्त योग्य वाटतो तो वाण आपण एकुण पेरणाऱ्या क्षेत्राच्या ५०% पुरेल एवढे बियाणे अगोदर खरेदी केले व उर्वरीत बियाणे पाऊस कसा पडतो. यावर ठरवणे हा पर्याय योग्य ठरु शकतो. बियाणे घाई घाईत घेणे व मिळेल ते घेणे नुकसाणीचे ठरु शकते. शेतकरी मित्रांनो पुर्ण वेळ निव्वळ शेती करणाऱ्या शेतकऱ्याचे एक पिक नुकसाणीत गेल्यास त्याची पुर्ण पैस्याची घडी बिघडते आणी ही बिघडलेली घडी व्यवस्थीत करण्यास खुप कालावधी जातो. त्यामुळे आपण शेती करत असताणा व्यवसाय दृष्टीकोण ठेऊन शेती करणे गरजेचे आहे. तरच आपण शेतकरी आपली प्रगती करू शकू. सारांश म्हणजे बियाणे विचारपुर्वक घेणे आवश्यक आहे.
३ पेरणी कालावधी : पाऊस ऊशीरा आल्यामुळे किंवा दुसऱ्या कांही कारणात्सव पेरणी जर १५ जुलै च्या पुढे जात असेल तर कमी कालावधीचे दुसरे पिक आपणास शक्य आहे का याचाही विचार करणे आवश्यक आहे. पेरणीच्या कालावधीनुसार बियाणाचा वाण निवडणे योग्य ठरेल.
४. पेरणी पध्दत किंवा टोकण : किफायतशिर सोयाबीन शेती करत असताणा पेरणी किंवा टोकण पध्दत हा मुद्दा ही महत्वाचा आहे. पेरणी पध्दत म्हणजे दोन ओळीतील अंतर हे ४५ किंवा ६० से.मी. म्हणजेच १८ किंवा २४ इंच आणी एकरी पेरणी किंवा टोकण किती बियाणे वापरायचे हे बियाणे कोणत्या वाण / जातीचे तसेच आपण करु शकणाऱ्या व्यवस्थापणावर ठरते.
वाण हा जास्त कालावधीचा व आपले व्यवस्थापण उत्तम असेल तर एकरी १५ ते २० किलो बियाणे वापरुण उत्तम उत्पन्न घेणे शक्य आहे.
वाण कमी कालावधीचा व व्यवस्थापण सर्वसाधारण असेल एकरी बियाणे आपल्या अनुभवानुसार वापरणे जास्त योग्य राहील.
आपण एकरी बियाणे वापरत असताणा जमीणीची प्रतवारी पाहणे ही गरजेचे आहे. जमीण भारी असेल तर सपतळ पेर किंवा टोकण जास्त योग्य राहते.
५ पाणी व्यवस्थापण:- सोयाबीन पिकास नेहमी (चार ते आठ दिवसाला ) पाऊस झाल्यास उत्पादण चांगले होते. (याकरीता जमीण वापस्यावर येणारी असावी) सोयाबीन पिकास १० दिवस पाऊस नाही आल्यास पाणी देणे फायद्याचे राहते. पाणी स्पिकंलर पध्दतीने देणे जास्त योग्य.
६. फवारणी व्यवस्थापन/ रोग नियंत्रण:- चांगले उत्पन्न घेण्याकरीता खालील प्रमाणे फवारणी करावी
- खोड अळी पासुण सरंक्षण मिळविण्याकरीता पेरणी नंतर ८ ते १० दिवसात पहीली फवारणी क्लोरोपायरीफॉस ५०% १ मिली प्रती लिटर पाणी किंवा निमअर्क १ मि.ली. प्रती लिटर पाण्यात फवारावे सोबत २ ते ३ ग्रॅम विद्राव्य १९:१९:१९ घेतल्यास सोयाबीन जोमात येते. एकरी ७० ते १०० लिटर पणी फवारावे.
- ३५ते ४५ दिवसांनंतर ( कळी लागण्यापुर्वी) १२:६१:०० विद्राव्य खत ५ ग्रॅम प्रती १ लीटर पाणी सोबत रोगानुसार एखादे किटकनाशक घ्यावे. एकरी १२५ ते १५० लिटर पाणी फवारावे.
- ६५ ते ७५ दिवसानी ( शेंगातील दाणा ज्वारी एवढा होण्या पुर्वी ) ००: ५२:३४ विद्राव्य खत सोबत प्रोक्लेम किंवा कोराजन सारखे चांगले किटक नाशक योग्य प्रमाणात घ्यावे आणी एकरी २०० लिटर पाणी फवारावे.
७ अन्नद्रव्य व्यवस्थापन/ खत:- सोयाबीन पेरत असताणा एकरी १ पोते २०:२०:००:१३ खत पेरावा मी हा खत पेरल्यास उत्पन्न चांगले मिळाले. खत कोणता वापरायचा हे आपल्या अनुभवाने ठरवावे.
८ कामगार व्यस्थापण/मजुर:- उत्तम रीत्या कामगाराचे व्यवस्थापण करण्यासाठी आपले काम
करण्याच्या अगोदर कामगाराशी संपर्क साधावा.
शेतीतील कामे वेळेवर होण्यासाठी कामगाराविषयी सकारात्मक विचार ठेवणे फायद्याचे ठरते.
९ काढणी/हाव्रेस्टींग/भरडण :- शेतकरी मित्रांनो आपण एवड्या मेहणतीणे व व्यवस्थापनाने आणलेले सोयाबीन चुकीच्या काढणी व्यवस्थापणामुळे नुकसाणीचे होऊ नये म्हणून जास्त विचार न करता सोयाबीन शेंगा भेड्या झाले की चांगला कामगार गट बघुन गुत्ते देणे जास्त फायद्याचे व आरामाचे होणे शक्य आहे. मी बरेच शेतकरी पाहीलेत एकरी २०० ते ४०० रु चा विचार करुण सोयाबीण काढणी गत्ते देण्यास उशीर करतात व ऐन वेळी कामगार न भेटल्यामुळे पैसे जास्त जातातच परंतू मानसिक त्रास व उन्हामुळे शेंगा तडकूण होणारे नुकसान खुप होते.
मला आलेल्या अनुभवातुन व असलेल्या माहीती प्रमाणे माझे विचार आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. अपेक्षा करतो की हा लेख आपणास सोयाबीन शेती किफायतशिर करण्यास मदत करेल.
धन्यवाद..
न.१
उत्तर द्याहटवा