कांदा रोप तयार करायचय न.१?/how make kanda rop no.1
कांदा रोप तयार करायचय☝?kanda rop tayar karachaya/ how make a onion rop👇.
शेतकरी मित्रांनो कांदा रोप आपल्या स्वत: च्या शेतात चांगल्या प्रकारे तयार करणे किंवा आणणे . हे एक कौशल्याचे काम आहे.
मी असी बरीच उदाहरणे पाहीलेत की शेतकऱ्याला २ किलो बियाण्याचे रोप लागणार असेल तर तो शेतकरी शिल्लक म्हणून , जोखीम नको म्हणून किंवा रोप विक्रीतून कांदा लागणीचा खर्च भागावा म्हणून २ किलो बियाण्याच्या रोपाची स्वत:ला आवश्यकता असताना देखील ५ ते ६ किलो बियाणे खरेदी करुण रोप तयार करण्यासाठी बियाणांची लागण किंवा शेतकऱ्यांच्या भाषेत रोप टाकतात. परंतू विविध कारणामुळे असी परिस्थिती/वेळ येते की त्या शेतकऱ्याला स्वत:लाच लागणीला रोप कमी पडते.शेतकरी मित्रांनो आपणापैकी बरेच या वाइट अनुभवातुन गेलेलो आहोत. हे असे का होते? असा प्रश्न आपण स्वत: ला गांभीर्याने विचारत नाहीत. आणी विचारला तर याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न आपण करत नाही. त्यामुळे मी असेही शेतकरी पाहीलेत की ही असी कांदा रोप तयार करण्यात ते बऱ्याच वेळी अपयशी झालेले आहेत.
वरील एवढी मोठी प्रस्तावणा याकरीता की आपणास विश्वास वाटणे आवश्यक आहे की हा लेख अनुभवाचा आहे.
शेतकरी मित्रांनो काळजी करू नका आपला कांदा रोप तयार करण्याचा जो प्रश्न आहे.त्याचे उत्तर या लेखाद्वारे आपणास नक्कीच देण्याचा प्रयत्न करतो. हे उत्तर केवळ पुस्तकी नसूण गेली ५ वर्ष मी स्वत: माझ्या शेतात न.१ कांदा रोप आणलेले आहे.
कांदा रोप टाकत/बियाणे साऱ्यावर टाकत असताना खालील बाबींचा विचार करणे आवश्यक व अत्यंत महत्वाचे आहे.मी असी बरीच उदाहरणे पाहीलेत की शेतकऱ्याला २ किलो बियाण्याचे रोप लागणार असेल तर तो शेतकरी शिल्लक म्हणून , जोखीम नको म्हणून किंवा रोप विक्रीतून कांदा लागणीचा खर्च भागावा म्हणून २ किलो बियाण्याच्या रोपाची स्वत:ला आवश्यकता असताना देखील ५ ते ६ किलो बियाणे खरेदी करुण रोप तयार करण्यासाठी बियाणांची लागण किंवा शेतकऱ्यांच्या भाषेत रोप टाकतात. परंतू विविध कारणामुळे असी परिस्थिती/वेळ येते की त्या शेतकऱ्याला स्वत:लाच लागणीला रोप कमी पडते.
वरील एवढी मोठी प्रस्तावणा याकरीता की आपणास विश्वास वाटणे आवश्यक आहे की हा लेख अनुभवाचा आहे.
शेतकरी मित्रांनो काळजी करू नका आपला कांदा रोप तयार करण्याचा जो प्रश्न आहे.त्याचे उत्तर या लेखाद्वारे आपणास नक्कीच देण्याचा प्रयत्न करतो. हे उत्तर केवळ पुस्तकी नसूण गेली ५ वर्ष मी स्वत: माझ्या शेतात न.१ कांदा रोप आणलेले आहे.
- ज्या जमीणवर रोप तयार करायचय ती जमीण पाणी धरुण तर राहत नाही ना? याचे उत्तर नाही .
- जास्त पाऊस झाल्यास त्या जमीणवर पाणी साचते का ? याचेही उत्तर नाही.
- १ किलो कांदा बियाणे टाकण्यास कमीत कमी २ ते ३ गुंठे जमीण क्षेत्र वापरावे यामुळे तुमचे क्षेत्र जास्त गुंतले तरीही ते फायद्याचे राहणार आहे. कारण यामुळे कांदा रोपाचा गणा/रोपाचे कोम हे जाड राहते .
- रोप सपतळ असल्यामुळे उंची कमी राहते त्यामुळे जास्त पाऊस झाला तरीही रोप आडवे पडूण होणारे नुकसान टाळले जाते.
कांदा बियाणे टाकण्याची पध्दत
- जमीण चांगली वापस्यावर असताणा बैलाणे कुळवुन घ्यावी .
- रोप तयार करायचे क्षेत्राच्या आकारानुसार व उतारानुसार सारे किंवा गादी वाफे करावे.
- सारे किंवा गादी वाफे करत असताणा महत्वाचे म्हणजे जास्त पाऊस झाला तरी पाऊस उघडला की दोन दिवसात जमीण वापस्यावर यावी. म्हणजेच साऱ्यात किंवा वाफ्यात पाणी पाऊस उघडल्यावर एक तासाच्या वरी थांबू नये.
- सारे किंवा वाफे केल्यानंतर पत्र्याच्या दाताळ्याने जमीणीवरील लहान ढेकळे बाजुला म्हणजे सारा किंवा वाफ्याच्या बाजुला सारावी.
- बियाण्यास एखादे स्प्रिंट सारखे बुरशीनाशक थोडे पाणी घेऊन लावावे. बियाणे जास्त घासू नये.
- बियाण्यास गडद रंगाचे बुरशीनाशक लावल्यामुळे रोपांचे बुरशीपासुन संरक्षण होते व बियाणे दाट पडत आहे का सपतळ हे ओळखण्यास मदत होते.
- बियाणे टाकत असताणा मुठीत न घेता पंज्याच्या पुढील चार बोटावर घेऊन हळुवार पणे जमीणीवर हात हालवीत टाकावे.
- जमीणीवर बियाणे समाण स्वरुपात (झुपक्यात न पडता) पडत आहे का हे पहावे.
- बियाणे टाकत असताणा कोणताही खत वापरू नये.
- बियाणे टाकल्यानंतर बी मातीआड होण्याकरीता दाताळ्याने माती हलवावी.
- माती हालवत असताणा माती गोळा होता कामा नये.
- रोप / बियाणे टाकण्याची पध्दत पुर्ण
रोप पाणी/ सिंचण व्यवस्थापण
- बियाणे टाकण्याची प्रक्रीया पुर्ण करुण लगेच पाणी द्यावे
- त्याच दिवसी नाही जमले तर दुसऱ्या दिवसी पाणी द्यावे
- पाणी देण्यास ऊसीर केल्यास मुंग्या बियाणे एका ठिकाणी गोळा करण्याची शक्यता आहे.
- पाणी रेणपाईप दिल्यास उत्तम कारण बियाणे वाहुण जाण्याचा धोका रहात नाही.
- रोप एक महीण्याच्या होइपर्यंत पाण्याचा ताण देऊ नये नाहीतर जमीण धपलल्यामुळे रोप जिरण्याची शक्यता राहते.
- कडक ऊन्हात व जमीण जास्त तापलेली असताणा पाणी देऊ नये.
- रोप एक महीण्याचे झाल्यास भरपूर पाणी द्यावे.परंतू जमीण वापस्यावरही रहावी.
- रोप उपटण्या अगोदर दोन दिवस रोप भिजवून घ्यावे.
रोप खत व फवारणी व्यवस्थापण
- एक महीण्याचे रोप झाल्यास १ किलो रोपास ३ ते ४ किलो १०/२६/२६, किंवा १२/३२/१६ या ग्रेडमधील खत टाकावा रोपाची वाढ कमी वाटत असल्यास १ किलो युरीया द्यावा. लगेच पाणी द्यावे.
- रोप उगवल्यानंतर दर ८ते १० दिवसाला एक बुरशीनाशक व एक किटकनाशक याची फवारणी घ्यावी. हवामानाचा विचार करुण फवारणी मधील अंतर कालावधी ठरवावा.
तरीही कांही अडचण/ समस्या आल्यास खालील मो.न. वर संपर्क करु शकता.
mo.no.9834827741
धन्यवाद
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा