दारीद्र्य, गरीबी की समृध्दी..ठरविणार आपणच
गरीबीची कारणे व त्यारील उपाय..
गरीबीत जन्मणे, गरीबीत वाढणे हे आपल्या हातातले नाही परंतू गरीबीतच मरणे ही जिवनाची शोकांतीका आहेच.परंतू मानव जातीचा आपमान आहे.
या शोकांतीकीची कारणे कोणती? व त्यावर उपाय काय?
या महत्वपुर्ण दोन प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा हा प्रयत्न.
जिवन अनमोल आहे हे समजणे आवश्यक आहे.हे अनमोल जिवनातील अनमोल अनुभूती घेण्याकरीता जवळ एवढा पैसा हवा की जिवनातील आवश्यक व वैध्य अस्या अनुभुती आपण अनुभूत करु शकू.
आपल्याला गरीबीची कारणे व उपाय शोधण्याअगोदर गरीबी काय हे समजणे गरजेचे आहे. ते खालील मुद्द्यातुन समजुण घेऊ. गरीबीच्या अगोदरची एक पायरी आहे ती म्हणजे दारीद्र्य.
दारीद्रय म्हणजे काय?
भुक लागेल तेंव्हा पोट भरण्यासारखे पोट भरूण खायला न मिळणे म्हणजे दारीद्रय.
शरीर झाकण्यासाठी न फाटलेली वस्त्र न मिळणे म्हणजे दारीद्र्य.
उन,वादळ व पाऊस या तीन्ही पासुन सरंक्षण मिळावे असा निवारा नसणे म्हणजे दारीद्र्य.
जिंवत असतो परंतू जिवन जगण्यासाठी आयुष्यभर फक्त गाढव कामच करतो ते ही दारीद्रयच.
आजाराची योग्य वेळी व योग्य ठिकाणी इलाज न करु शकणे म्हणजे दारीद्रय.
वरील सर्व मुद्दे असताणा देखील अनावश्यक विषयात आपला वेळ घालविणे म्हणजे दारीद्रय पोसणे.
वरील मुद्दे लक्षात घेऊन परिक्षण केल्यास बराच वर्ग आज देखील दारीद्र्यात आपले जिवन व्यतीत करत असल्याचे लक्षात येईल.
दारीद्रय पाहीले आता गरीबी म्हणजे काय ? ते पाहू
अन्न,वस्त्र व निवारा या प्राथमीक गरजा भागविण्यात जो नेहमी व्यस्त राहतो.
वरील तिन प्राथमीक गरजा व्यतीरीक्त इतर कांही करण्याकरीता त्याने पैसे खर्च केले कि त्यांच्या प्राथमिक गरजा अपुऱ्या राहतात.
जो महीण्यातुन एक दिवसही करमणूक, मजा, आनंद, याकरीता आपल्या राहत्या गावापासुण किंवा शहर सोडूण कुठे फिरण्यास जाऊ शकत नाही.
जो उच्च शिक्षण घेऊ शकत नाही.
ज्याला चांगल्या खाजगी दवाखान्याचे रु.१०००००/- च्या पुढील बिल भरण्यासाठी इतरांकडूण पैसे घ्यावे लागतात.
प्राथमीक गरजा काटकसरीणे भागवुन वर्षाकाटी १०००००/- रक्कम शिल्लकीत ठेऊ शकतो त्यास गरीब म्हणता येईल.
जो
दारीद्रय व गरीबी कशाला म्हणतात हे आपण पाहीले त्याची कारणे पाहुयात नंतर आपणास उपाय काय करू शकतो यावर आपणास अभ्यास करणे सोपे होइल.
दारीद्रय असण्याची कारणे.
दारीद्रय असण्याचे महत्वाचे कारण हे आहे . बहुतांश प्रमाणातील दारीद्रयात जिवन व्यतीत करणाऱ्यांना माहीतच किंवा समजतच नाही. आपण जसे जगतोय याला दारीद्र्य म्हणतात.
तो अस्या भ्रमात असतो की आपण लय भारी काम करतोय "आपणा भी टायम आयगा". म्हणजेच दारीद्र्या मध्ये जगत असणाऱ्यांची नासमज,अज्ञान व पक्की झालेली चुकीची मानसिकता.
कांही प्रमाणात किंवा ज्यांना समजतय की याला दारीद्र्य म्हणतात त्याचीही यातून बाहेर पडण्याची उदासिण मानसिकता.
समज असताना देखील अस्या विषयांच्या आधिन होणे जे विषय कर्तुत्वावर नकारात्मक परीणाम करतात.
गल्ली पासुण दिल्ली पर्यंत व व्यक्ती पासुण नेत्या पर्यंत असणारी भ्रष्ट मानसिकता. ह्या मानसिकतेमुळे बहुतांश सरकारी योजना या पैसेवाल्यांना पैसा मिळवून देण्याचे काम करतात.
पैस्याचे मोल माहीत नसणे मोल माहीत असेल तर ते कस्यासाठी खर्चावे व खर्चताना प्राधान्यक्रम ठरविण्यात चुक करणे.
उत्पन्न वाढणाऱ्या विषयास पैसे गुंतविण्याएवजी करमणूकिचे विषय किंवा अनावश्यक विषयासाठी पैसे गुंतविणे.
घरात कायम आजारी माणूस असणे.
शाररीक,बौध्दिक,मानसिक सक्षमता नसणे.असेल तर त्या पुरेपुर वापर पैसा प्राप्तीसाठी न करणे.
स्वत:मधील प्रतीभा न ओळखता चुकीच्या क्षेत्रात संघर्ष करत राहणे.
पैसा मिळविण्याची व बचत करण्याची महत्वकांक्षा नसणे.
बातम्या,राजकारण,समाजकारण,मोबाइल व इतरत्र अनावश्यक लक्ष देणे व स्वत:च्या लक्षापासूण वीचलीत होणे.
इतरांणा जबाबदार धरण्याची मानसिकता.
दारीद्र्य गरीबी दुर करुण समृध्दी मिळविण्याचे उपाय.
दारीद्रय व गरीबी यांच्या कारणाचा अभ्यास केल्यास कारणामध्येच आपणास उपाय दिसतात.
यासाठी शांत बुध्दीने व विचाराणे निश्चय करण्याची गरज आहे. आयुष्याचा, जिवनाचा खरा आनंद घ्यायचा असेल. आर्थिकदृष्ट्या सक्षम असणे खुप आवश्यक आहे. याकरीता वरील कारणापैकी किती कारणे स्वत:वर लागू होतात हे खुल्या मानसिकतेणे पहावे व ते खुल्या मानसिकतेतुन स्विकारुण निश्चयी होऊन त्यावर कठोर मानसिकता ठेऊन कार्यवाही करणे गरजेचे आहे.
असी कितीतरी उदाहरणे आहेत.त्यांचा दारीद्र्यात जन्म झाला परंतू त्यांनी स्वत:च्या कृतीने त्यांच्या जिवनात समृधदी आणली.
गरज आहे आपण मानव आहोत हे समजण्याची व हे मानव जिवन अनमोल असुण जिवन जगत असताना बौद्धिक, वैचारीक, शाररीक, कौटुबीक व आर्थिक सक्षम होऊन. जिवनातील या सृष्टी कर्त्याने निर्माण केलेल्या सुअनुभूती घेण्याची.
दारीद्र्य व गरीबी हा शाप न समजता हे आपल्यासाठी एक आव्हाण, परीक्षा व सिध्द करण्याचे साधन आहे. हे स्विकारूण यावर मात करुण दाखविणारच असा निश्चय करूण इतर कोणाला जबाबदार न धरता स्वत: मधील दोष,कमी,अवगुण यांना अग्नी देऊण आपणच आपले भाग्यविधाते होऊयात.
दारीद्र्य व गरीबीतुन समृध्दी मिळविण्याकरीता केवळ गाढव काम करुण चालणार नाही.
स्वत:ची प्रतीभा ओळखणे गरजेचे.
शाररीक प्रतीभा व बौध्दीक प्रतीभा.
या प्रतिभेवर घातक परीणाम करणाऱ्या विषयांचा त्याग करणे व त्यांच्यापासुण सावध राहणे.
या प्रतीभांचा उपयोग करण्याकरीता पैसे नसतील तर त्याचा उपयोग करण्याकरीता सुरूवातीस कांही काळ पैसा जमा करण्याकरीता काम करणे.
धैर्य ठेवणे :- साध्य करण्याच्या मार्गात विविध अडथळे व प्रसंग येणार आहेत. याकरीता न खचता धैर्याने त्यावर मात करणे.
टिकाकार व नकारात्मक विचाराकडे दर्लक्ष करणे व त्यांच्यापासूण दुर राहणे.
चांगले उर्जा मिळणारी , माहीती मिळणारी अस्या पुस्तकाचे वाचन किंवा ऑडीओ ऐकणे.
पैस्याने व विचाराणे समृध्द असणाऱ्यांनी गरीबी व दारीद्र्यात जगत असणाऱ्यांना तुम्हचे जगणे हे जिवन नाही तर जिवन यापेक्षा खुप सुंदर आहे याचे ज्ञान देण्यासाठी प्रयत्न करणे.
लेखातुण आपण दारीद्र्य, गरीबी कशाला म्हणतात त्याची कारणे , दारीद्र्य,गरीबी यातुन बाहेर पडूण समृध्दी आणण्याबाबत काय करता या संदर्भात विचार विमर्श केला आहे . विश्वास वाटत़ो ज्यांना दारीद्र्य व गरीबी यातुन समृध्दी कडे जाण्यास मार्गदर्शक व प्रेरक ठरेल.

नक्कीच समृध्दी आवश्यक आहे हे मानव जिवन अनुभवण्याकरीता , खुप छान लेख..
उत्तर द्याहटवा