PRAGATSHEEL SHETKARI प्रगतशिल व समृध्द शेतकरी होणे आहे.
शेतकरी शेतीमध्ये कष्ट करतो इतर व्यवसायीक त्याच्या व्यवसायात करतो त्याप्रमाणे किंवा त्यापेक्षा कमी जास्त प्रमाणात परंतू इतर व्यवसाय करणाऱ्यांच्या राहणीमाणात किंवा आर्थिक प्रगती होण्याचे जे प्रमाण आहे. त्याची तुलणा शेती व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांशी केली तर इतर कोणताही व्यवसाय व शेती व्यवसाय यामध्ये प्रगती आलेख यात खुप तफावत/अंतर दिसते.
वरील निरीक्षण करण्याचा विचार जर फक्त आपल्या शेतकऱ्यांच्या डोक्यात आला तरी शेतकरी म्हणून आपले प्रगतीच्या मार्गतील पहिले पाऊल पडले असे समजावे.
शेतकरी मित्रांनो आपल्या आर्थिक/पैशाच्या कासवगती किंवा अधोगतीचे मुळ आपण लक्षात घेणे आवश्यक आहे नुसते आवश्यकच नाही तर अत्यावश्यक आहे.
अत्यावश्यक का?
शेतकरी मित्रांनो आपण स्वत:चा व सोबतच आपल्या आवती भोवती जे की फक्त शेती व्यवसाय करतात, शेती व्यवसाय म्हणणे चुकीचे होईल फक्त शेती करतात म्हणुयात यांचे निरीक्षण व परीक्षण केल्यास १०० शेतकऱ्यांपैकी किती शेतकरी त्यांच्या गेली १० ,२० वर्ष किंवा अख्या अयुष्यात म्हणुयात कोणत्या अवस्थेत आहेत. आपण याची वर्गवारीच करु.
अधोगती :- मालमत्ता किंवा संपती कमी झाली.
स्थिरता :- जैसे थे, आहे तसेच.
कासव गती:- अख्या अयुष्यात रु.१ लाख ते रु.५ लाख संपती वाढ.
प्रगती:- अख्या अयुष्यात रु.५ लाख ते रु.२५ लाख. वाढ.
समृध्दी :- असणाऱ्या संपती मध्ये ५ पटीच्या पेक्षा वाढ.
वरील वर्गवारीनुसार जर निरीक्षण व तपासणी केली तर अधोगती व स्थिरता या वर्गवारीत १०० शेतकऱ्यांपैकी ८० ते ९० शेतकरी असतील ,कासव गती ५ ते १० शेतकरी, प्रगती मध्ये ३ ते ५ व १ शेतकरी समध्दी मध्ये असेल.
असे भयानक व दुख:द वास्तव शेतकऱ्यांचे व शेती व्यवसायाचे आहे. आपण शेतकरी याचा विचार करुण यावर डोळसपणे मार्ग शोधणे अत्यावश्यक आहे.
नाहीतर आपले वर्तमाणापेक्षा भविष्य खुपच भयावह व दुख:द असेल. आणी जन्मजात प्रतीभासप्पन्न आपल्या बालकांना तरुण वयात व आयुष्यभर नको त्यांची गुलामी करण्याची वेळ येईल. याकरीता गळ्यापर्यंत आलेल्या पाण्यातुण बाहेर पडून किणारा शोधणे आवश्यक आहे. नाहीतर आपण कधी बुडालो हे आपल्याला समजणार नाही.
आज आपल्या घरात एखादा सदस्य आजारी पडला तर त्याच्या आजारापेक्षा जास्त चिंता असते ती दवाखाण्यात होणाऱ्या बिलाची.कारण जवळ पैसेच नसतात आणी कोणाकडून मिळण्यासारखी पथ आपली राहीलेली नसते. एवढी भयानक परिस्थितीत जर आपण डोळसपणे स्पष्ट विचार करुण मार्ग काढणार नाहीत का? मग मार्ग कोण काढणार ? शेजारी,गावकरी, जनगोत, सरकार की देव ? या सर्वांकडूण आशा अपेक्षा करणे म्हणजे स्वत: ला विकणे हे विकणे तुम्हाला मान्य असेल, यात तुम्हाला आनंद असेल तर यापुढचा लेख आपल्या साठी नाही क्षमा असावी.
याउलट स्वत:चे सातंत्र्य आपल्याला प्रिय वाटत असेल व स्वाभिमानाने समृध्द जिवन जगायचे असेल तर चला आपण मिळूण मार्ग शोधण्याचा प्रयत्न करुयात.
मार्ग कसा शोधायचा व प्रगत , समृध्द शेतकरी कसे व्हायचे?
वरील वर्गवारीकडे जाऊयात ,
१०० शेतकऱ्यामधील मधील आपल्याला १असणाऱ्या समृध्द शेतकरी व्हायचय, नाहीतर कमीत कमी प्रगतशील शेतकरी व्हायचेच आहे. मग आपणाला या प्रगतशील शेतकरी व समृध्द शेतकरी यांची संख्या वाढवायची आहे. शेती व्यवसाय हा समृध्द व्यवसाय असी वास्तव प्रतीमा निर्माण करायची आहे. यासाठी काय करणे गरजेचे, ते खालील मद्दातुन समजावुन घेऊ.
मी लेख लिहीणारा प्रामाणीकपणे सांगतो की मी वरील शेतकऱ्यांच्या क्रमवारीतील ८० शेतकऱ्यामधील शेतकरी म्हणजेच "अधोगती" या श्रेणीतील आहे. या श्रेणीत मी का गेलो? याला शेती नसूण इतर आहेत.याचे चटके मी जवळूण अनुभवलेत.
आनंद याचा आहे गळयापर्यंत आलेले पाणी नाका तोंडात जाण्याअगोदर मला खरी जाग आली व मी किणारा शोधण्याचा निश्चय केला. निश्चय करत करतच हा लेख लिहतोय. कारण हा लेख अस्या गळ्यापर्यंत पाणी आलेल्या शेतकरी मित्रांना किणारा दाखविण्याचे व योग्य दिशेणे हात पाय हालविण्यास व प्रगतशील शेतकरी, समृध्द शेतकरी होण्यास सहाय्यक ठरेल. इतकीच इश्वरचरणी प्रार्थना करतो.
इतिहास, वर्तमाण व उज्वल भविष्य :-
आपल्या आतापर्यंतच्या शेती अनुभवातून व आपल्या शेती पिक पध्दती इतीहास आपल्याला वर्षनिहाय,पिकनिहाय आठवता येतो का पहा.
जर आठवता येत असेल तर आपण शेती मन लावून केली व आपल्याला शेतीची आवड आहे हे सिध्द झाले. म्हणजे आपल्याला आपल्याच इतीहासातून बोध घेणे शक्य व सोपे आहे. प्रगती साधणे शक्य आहे.
जर आठवत नसेल तर आपण शेती मन लावून न करता नाइलाजाने केली असे समजावे, किंवा आपल्याला शेतीत आवड आहे परंतू स्वातंत्र्य नाही इतरांच्या आदेशाने आपण काम करता असे समजावे.
नाइलाजाणे करत असाल तर शेतीच नाही तर, कोणतेही काम नाइलाजाणे/आवड नसताणा करत असाल तर आवडीचे काम शोधा. ज्यात आपल्याला वेळ गेलेला समजत नाही. शर्त एवढीच त्यातुन पैसा मिळावा व ते कायदयाचे असावे.
आपला मागील अनुभव , इतिहास वर्षनिहाय व पिक निहाय आठवल्यानंतर कोणती पिके जास्त फायद्याची झाली व का ? या प्रश्नाची उत्तरे शोधा.
त्याप्रमाणेच कोणती पिके तोट्यात गेली? व का? याही प्रश्नाची उत्तरे शोधा.
उत्तरे मिळाल्यानंतर फायद्याची पिके आणखी फायद्याची करुण तीच पिके आपण वारंवार घेऊन आपण आपली आर्थिक प्रगती साध्य करू शकतो का? याचा विचार करा.
तोट्याची पिके ज्या कारणामुळे तोटयात गेली त्या कारणावर मात करुण ती पिके आपण फायद्यात घेऊ शकतो का? याचा व्यवहारीक व वास्तवीक विचार करा.बळच आवसन आणणे घातक ठरू शकते. त्याचा नाद सोडूण द्या.
शेतीचे कमीत कमी पुढील एक वर्षाचे नियोजीत पिकाचे नियोजण अगोदर करा.
नियोजण करत असताणा निसर्ग, भांडवल, कामगार व बाजारभाव यांचा विचार करुण पर्यायात्मक पिकांचा समावेश नियोजणात असू द्या.
आपण स्वत: व घरातील इतर सदस्य रोजचा सरासरी व सातत्याने किती वेळ शेतीकामात सक्रीय असतो याचे तास काढा. हे तास काढचाल त्यावेळी लक्षात येइल की हे खुप कमी आहे. हे कामाचे तास वाढवा.
शेती काम करत असताना शरीर कामापेक्षा वेळेनुसार वेळेवरच काम करण्यास व तेही शांत बुध्दीने नियोजण करुण करण्यास प्राधान्य द्या.
शेती करणं यालाही एखादी स्पर्धात्मक परीक्षेस लागणाऱ्या बुध्दी समान बुध्दी व शेतीतील ज्ञान व महत्वाचे म्हणजे समज लागते हा मद्दा ध्यानात घ्या.
भांडवल नाही , भांडवल नाही हे रडणे बंद करुण भांडवल तयार करण्यासाठी कमी कालावधीचे कमी क्षेत्रात जोखमीची पिके घेऊण (कोंथीबीर,मेथी,कांदा रोप विक्रीसाठी इ.) भांडवल निर्माण करा.
कर्जाचे किंवा उष्णे पैसे घेऊण शेती करु नका.
स्वत: शेतातून सध्य परीस्थित भांडवल निर्माण करणे शक्य नसेल तर बाहेर पडा परंतू फक्त भांडवल नाही म्हणुन रिकामे दिवस घालवू नका.
प्रगतशिल व समृध्द शेतकरी व त्यांचा इतिहास,वाटचाल व त्यांचे रोजचे कामकाज, त्यांचे शेतातील नियोजण, पिकपध्दती , जोडव्यवसाय याचा विचार , निरीक्षण व परीक्षण करावे लागेल.
एक वर्षात एकरी खर्च वजा किती उत्पन्न होणे आवश्यक आहे. तरच आपण प्रगतशिल समृध्द शेतकरी होऊ शकतो याचा व्यवहारी व व्यवसायीक दृष्टीकोण ठेऊण शेती करा.
आदर्श पिक पध्दती ;-
आपले एकुण क्षेत्रानुसार खालील प्रमाणे टक्केवारीत पिक घ्या.
एकुण क्षेत्राच्या १०% ते २०% क्षेत्र फळांची झाडे लावा ही आपल्याला कमी खर्चात उत्पन्न तर देतील जोडूण भविष्य निश्चिंत करतील.
१०% ते २०% क्षेत्रावर जोखमीची लॉटरी पिके घ्या.( कांदा,कोथिंबीर इ.).
पाणी असेल तर ५०% क्षेत्र ऊसाला किंवा पाण्याच्या प्रमाणानुसार ऊस हमखास करा.
राहीलेले क्षेत्र हमखास किंवा कमी जोखमीची पिके घ्या.( सोयाबीन, गहू, हरबरा, ज्वारी)
आपण जे पिक घेतोय ते न.१ आणा जास्त क्षेत्र असेल आपल्याला करणे होत नसेल तर बटइने द्या.परंतू सगळे करण्याच्या नादात एकरी नफ्याचे प्रमाण कमी करू नका.
वरील लेखातुन मला असणाऱ्या अल्पशा माहितीप्रमाणे व अनुभवातुन प्रगतशील व समृध्द शेतकरी घडण्यासाठी प्रयत्न केला आहे. अपेक्षा करतो माझ्या शेतकरी मित्रांना तो आवडेल.
आपले विचार कमेंट मध्ये आवश्य मांडा आपण मांडलेले विचार माझ्यासाठी व लेख वाचणाऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरतील.
धन्यवाद.

विचार करण्यास व व्यवहारीक ,व्यवसायीक शेती करण्याचा दृष्टीकोण देणारा लेख
उत्तर द्याहटवा